पाच राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये मुख्यतः
पश्चिम बंगालमध्ये
ममता बॅनर्जी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने केंद्रीय नेतृत्व तसेच देशभरातून जे नेत्यांचे जाळे होते, त्याच्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी लढवय्या वृत्ती, समोरून वार करणे, सहन करण्याची आणि त्याला उत्तर देण्याची जी नीती अवलंबली तसेच नंदिग्राम मध्ये जाऊन सुरेंद्र अधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे धाडस दाखवले या धाडसाचं लढवय्या वृत्तीचं कौतुक करावे तेवढे कमी आहे. आज देशाला आणि विविध पक्षांना त्यांनी निवडणूक आक्रमकपणे कशी लढवता येते इथे एक उदाहरण घालून दिलेला आहे. त्यांच्या विजयात नक्कीच प्रशांत किशोर व त्यांच्या i Pac टीमचा मोलाचा वाटा आहे, त्यांनी केलेले नियोजन छोट्या-मोठ्या बारीक गोष्टींकडे नवीन चेहरे देण्याचे धाडस हे बंगाल मध्ये ममतांना अभूतपूर्व विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले.
केरळ
मध्ये खरतर पाच वर्षाच्या सरकार भूकंप, पूर आणि आता क रो ना याच्याशी हे सरकार लढत असताना त्यांनी बहुमत मिळवलेला आहे ते त्या सरकारने केलेलं काम आणि जनतेच्या प्रति असलेले जवळीक दाखवते. डाव्यांचा आता शेवटचा गड त राखला हे विशेष
तामिळनाडूमध्ये
मागील पाच वर्षात मोठमोठी राजकीय स्थित्यंतरे घडली , जयललित असतील ,शशिकला असतील आणि त्यानंतर आलेली ही जोडगोळी, तामिळनाडू मध्ये करुणानिधी नंतर स्टॅलिन हे एक खूप मोठं नेतृत्व मिळाले हे जनतेने दाखवून दिलेला आहे ,स्टॅलिन तसे करूनानिधी मुळे झाकोळले गेले होते, आता मात्र त्यांना तामिळनाडू बरोबरच तेथील जनतेशी आणि देशभरातल्या लोकांना त्यांचे कार्य दाखवण्याचे मोठी संधी मिळाली आहे आणि काँग्रेसनेही त्यांच्याबरोबर योग्यप्रकारे वाटाघाटी करून आपल्या जागा वाढवल्या हे ही महत्त्वाचेच आहे.
आसाम आणि पॉंडेचरी
मध्ये काँग्रेसला अधिक चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवता आली असती आणि चांगल्या पद्धतीने विजयाच्या दिशे ने जाता आले असते, काँग्रेसमध्ये राहुल गांधी वगळता इतर नेत्यांनी आक्रमकता व लढवय्या वृत्ती दाखवणे गरजेचे आहे तरच अपेक्षित बदल मिळू शकतो या पाच राज्यांच्या वैशिष्ट्य असं साम-दाम-दंड-भेद या सर्व नि तीच्या विरोधात लढण्याचादेशाला एक नवीन फॉर्म्युला मिळाला आहे तो म्हणजे आहे लढवय्या वृत्ती, आक्रमकपणा, योग्य नियोजन आणि नवीन निवडणूक तंत्रांचा वापर , निकालामुळे येणाऱ्या काळात देशाची राजकारणाची दिशा नक्कीच वेगळे वळण घेईल असे दिसते आहे ,तसेच हे निकाल येणाऱ्या काळात िसर्या आघाडीचे तयारीच्या दृष्टीने निर्देश करतात.
महाराष्ट्रात
झालेली विधानसभा पोटनिवडणूक निकाल हे स्थानिक पातळीवरचे राजकारण कारखानदारी गट तसेच योग्य उमेदवाराची निवड न करणे तसेच अंतर्गत राजकारणाचे फटके यामुळे गाजणार याचे पडसाद येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विविध निवडणुकांमध्ये दिसतील
कर्नाटक
मध्ये झालेल्या पंचायत निवडणूक मध्ये डीके शिवकुमार यांनी त्यांच्या इलेक्शन तंत्र आणि मंत्राची जादू वापरून पंचायत इलेक्शन मध्ये कर्नाटकामध्ये काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले.
तसेच प्रशांत किशोर यांचे I PAC आणि प्रशांत किशोर यांनी केलेलं काम ही देशात निवडणूक प्रणालीवर छाप पाडणारे असे आहे, यामध्ये त्यांनी नियोजन केलेली तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही राज्यांमध्ये एक सरकार असताना अनेक सरकारच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून दाखवलेली आहे.
विशेष करून पाची राज्यांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची मध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .
सर्व विजयी उमेदेवारांन सर्वसामावेशक राजकारण्याच्या शुभेच्छा
प्रथमेश विकास आबनावे
Director and Chief Analyst
संचालक आणि प्रमुख विश्लेशक
Election bull Pvt Ltd




