
जपानमधल्या, जगण्यातील सवयी बदलण्याबद्दल आणि त्याचे सोप्या सोप्या पद्धतीने आचरण
आज #जागतिकपुस्तकदिन
पुस्तकांमध्ये ज्ञानाचे भांडार तसेच समाजपरिवर्तनाचे, विज्ञाननिष्ठ प्रगतीचे स्वरूप स्पष्ट स्वरूप दिसते,आचार विचार त्यातील बदलांची स्वरूप पुस्तकातून प्रतीत होते. पुस्तकरूपी ज्ञानाचा ठेवा आम्हाला आमच्या कुटुंबियांना आमच्या आजी कै हेमलता मारुतराव आबनावे आणि आमचे वडील कै डॉक्टर विकास मारुतराव आबनावे त्यांच्या रूपाने आम्हाला लाभला आहे
,आज ठेवा जतन करून वाढवण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत . मी नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल जागतिक पुस्तकदिना- निमित्त अपणास थोडक्यात सांगू इच्छितो
, #Kaizen .कायझेन पुस्तक जपानमधल्या, जगण्यातील सवयी बदलण्याबद्दल आणि त्याचे सोप्या सोप्या पद्धतीने आचरण संदर्भातलं अतिशय सुंदर पुस्तक #SarahHarvey सारा हार्वे यांनी लिहले आहे, या पुस्तकामध्ये तुमच्या छोट्या छोट्या सवयी बदला बद्दल छोट्या छोट्या क्लुप्त्या दिल्या आहेत तसेच या पुस्तकांमध्ये तुमच्या दैनंदिन गोष्टी, तुमचं कामकाजाचे गोष्टी, तुमच्या पैशाबद्दल ,तुमच्या घरा बद्दल ,तुमच्या रिलेशनशिप ,बद्दल तुमच्या सवयीबद्दल ,तुमच्या समोर असलेल्या चॅलेंजेस बद्दल, तुमच्या हेल्थ बद्दल ,अतिशय योग्य अशा पद्धतीने आचरण विचार बदलण्यात संदर्भात योग्य असे उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत.
यामधील #bulletjournal बुलेट जर्नल याविषयी तर नक्की वाचलेच पाहिजे
. जरूर तुम्ही हे पुस्तक एकदा वाचावे असेच आहे .Japanese method for transformation habits बदलत्या काळात या सारख्या छोट्या कृप्त्या चे आचरण करणे काळाची गरज बनली आहे. हा सर्व खटाटोप आपणास या पुस्तकाची माहिती देण्यासाठी जरूर वाचावे असे #Kaizen आपणा सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा.
प्रथमेश विकास आबनावे
23/04/2021