“वसुधैव कुटुंबकम्” — हा स्थलांतरितांचा नव्हे, तर ग्लोबल सिटीजनशिपचा विजय; एका जागतिक शहराचं नवं स्वप्न

> “A moment comes, which comes but rarely in history…”— पं. जवाहरलाल नेहरू
न्यूयॉर्कच्या धगधगत्या राजकारणात एक ऐतिहासिक पर्व सुरू झालं आहे.भारतीय वंशाचा, मुस्लिम आणि प्रगतीशील विचारांचा नेता झोहरान क्वामे मामदानी (Zohran Kwame Mamdani) हे न्यूयॉर्कचे पहिले भारतीय-वंशीय मुस्लीम महापौर म्हणून निवडले गेले आहेत.त्यांचा विजय म्हणजे केवळ सत्तेचा बदल नव्हे, तर जगभरातील मानवतेच्या एकतेचं प्रतीक —एक असा क्षण, जेव्हा “वसुधैव कुटुंबकम्” ही भारतीय संकल्पना न्यूयॉर्कच्या शहरराजकारणात मूर्त स्वरूपात उतरली.
कौटुंबिक वारसा आणि शिक्षण
१८ ऑक्टोबर १९९१ रोजी युगांडाच्या कॅम्पाला शहरात जन्मलेले झोहरान यांचे बालपण अनेक संस्कृतींच्या संगमात गेले.त्यांचे वडील प्रा. मह्मूद मामदानी हे आफ्रिकेतील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, तर आई मीरा नायर या भारतीय-अमेरिकन चित्रपटदिग्दर्शिका — “सालाम बॉम्बे!”, “मॉन्सून वेडिंग” सारख्या चित्रपटांच्या निर्माती.आई भारतीय, वडील आफ्रिकन — आणि या दोन खंडांच्या अनुभवांमधून घडलेलं झोहरानचं व्यक्तिमत्त्व जागतिक जाणिवांनी परिपूर्ण आहे.
सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कला आले.Bowdoin College (Maine) मधून त्यांनी Africana Studies मध्ये पदवी मिळवली आणि सामाजिक समतेच्या चळवळीशी जोडले गेले.
शून्यातून उभं राहिलेलं राजकारण
झोहरान मामदानी यांचा राजकीय प्रवास पारंपरिक अर्थाने सुरू झालाच नाही —ना मोठं कुटुंब, ना आर्थिक पाठबळ, ना पक्षीय फंडिंग.त्यांच्या मोहिमेत एकही भांडवलदार उद्योगपती किंवा कॉर्पोरेट दाता नव्हता.प्रचारासाठी निधी लोकांच्या छोट्या देणग्यांतून, विद्यार्थ्यांच्या मदतीतून आणि स्वयंसेवकांच्या विश्वासातून जमवला गेला.
२०१९ मध्ये त्यांनी Democratic Socialists of America च्या पाठिंब्याने New York State Assembly District 36 मधून उमेदवारी दिली.तेव्हा त्यांच्याकडे भव्य जाहिराती नव्हत्या; पण त्यांच्या टीमकडे भव्य कल्पना होत्या.ते स्वतः त्यांच्या मोहिमेचे Campaign Manager होते —दररोजचे नियोजन, सोशल मीडिया, मैदानातील सभा, घराघरात भेटी — सर्व त्यांनी स्वतः सांभाळलं.ही मोहीम एक ‘ग्रासरूट मूव्हमेंट’ बनली.
अस्टोरिया, क्वीन्स, ब्रॉन्क्स अशा भागांतून हजारो नागरिक त्यांच्या सभांना स्वतःहून येऊ लागले.“New York for All” हे त्यांचं घोषवाक्य लोकांच्या तोंडात रुजलं.

प्रमुख सामाजिक मुद्दे
मामदानी यांनी शहरातील खऱ्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून मोहीम उभी केली.त्यांच्या जाहीरनाम्यात ठळकपणे हे विषय होते —
1. Public Transport Free Fare Policy — प्रवाशांसाठी मोफत बससेवा, “बस ही हक्काची, नाही तर लक्झरीची वस्तू नाही.”
2. Rent Control Reform — भाड्यांवरील नियंत्रण कडक करून सर्वसामान्यांसाठी घर मिळण्याची हमी.
3. Local Small Business Revival — स्थानिक व्यवसायांना करसवलती, लघु उद्योगांसाठी अनुदाने.
4. Immigrant Rights — स्थलांतरितांसाठी न्याय आणि नागरिकत्व प्रक्रियेत समानता.
5. Universal Child Health & Care — प्रत्येक मुलासाठी मोफत आरोग्यसेवा, मानसिक आरोग्यसल्ला आणि शालेय आहार.

जनता उतरली रस्त्यावर
मामदानींच्या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे — जनतेचा स्वतःचा सहभाग.कॉर्पोरेट जाहिराती नव्हत्या, पण हजारो स्वयंसेवक होते.शहराच्या गल्लीपासून सबवे स्टेशनपर्यंत लोकांनी त्यांच्या पोस्टर्स स्वतः चिकटवले, निधी स्वतः गोळा केला.शेकडो तरुण आणि कामगार “Team Zohran” बनून त्यांच्या प्रचारात उतरले.लोकांनी नेत्याला नव्हे, नेत्याने लोकांना चालवलं.—

विरोध आणि डोनाल्ड ट्रम्प यांची टीका
प्रगतीशील विचार आणि समाजवादी दृष्टिकोनामुळे त्यांच्यावर पुराणमतवादी गटांचा विरोध झाला.त्यांच्या इस्राएल-पॅलेस्टाईन विषयावरील भूमिकेमुळे काही माध्यमांनी त्यांना “विवादग्रस्त डाव्या विचारसरणीचा नेता” ठरवलं.
याच पार्श्वभूमीवर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सभेत अप्रत्यक्ष हल्ला केला —>
“अशा समाजवादी धोरणांनी अमेरिका ओळख हरवते आहे.”
झोहरान मामदानी यांचं प्रत्युत्तर होते थेट आणि प्रखर —> “
अमेरिका ओळख हरवत नाही; ती स्वतःला पुन्हा शोधते आहे — समानतेच्या मार्गाने.”

इतिहास घडवणारा भाषणाचा शेवट
विजय भाषणात त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्या
“A moment comes, which comes but rarely in history…” या ओळी उद्धृत केल्या.
त्यानंतर लोकांच्या जयघोषात त्यांनी “Dhoom Machale” हे बॉलिवूड गाणं लावून उत्सव साजरा केला —भारतीय संगीताच्या सुरांवर जगातील सर्वात मोठ्या शहराने एक स्थलांतरिताचा नाहीतर एक ग्लोबल सिटीझनचा विजय साजरा केला.—🌍
जागतिक दृष्टिकोन
झोहरान मामदानी यांची राजकारणाविषयीची दृष्टी स्थानिक नसून वैश्विक आहे.ते हवामान न्याय, सामाजिक समता, आणि स्थलांतरितांचा अधिकार यांसारख्या प्रश्नांना जोडून शहराचे नवे मॉडेल उभारत आहेत.त्यांच्या मते —>
“न्यूयॉर्क हे शहर नाही, ते जगाचं आरशातलं प्रतिबिंब आहे.”—
Prathamesh Vikas Abnave
aabnave.prathamesh@gmail.com +919823232573