
सध्याच्या काळात बिटकॉईन आणि इथेरियमनं आभाळ मारलच आहे. यातच एक नवीन नावं आलय ते DOGECOIN. याचा उच्चार डॉगी कॉईन .
तर क्रिप्टो करन्सीच्या बाजारात सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारा कॉईन म्हणून डॉगीकाईनचा उल्लेख व्हायला लागलाय. याच्या जबराट मागणीमुळे ४ मे ला अमेरिकेचा रॉबिनहुड आणि भारताततला वजीरएक्स क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म क्रॅश झाले होते.
काय आहे अशी जादू…?
मागच्या वेळी टेस्लाने बिटकाईनमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याची बातमी आली होती त्यानंतर बिटकॉईन ढगाच्या पार पुढं गेला. तसचं डॉगीकॉईनचं होत आहे. मस्क सोबतच डल्लास मेवरिक्स चा मालक मार्क क्युबन, रॅपर स्नूप डॉग आणि रॉक म्युझिशियन जीन सिम्मोन्स यांनी देखील डॉगी कॉईनला पाठींबा दिला. मग भाऊ हवेत जाणारच होते.
बिटकाईन, इथेरियम सारखाचा हा डॉगीकाईन. म्हणजे व्हॅर्म्युअल कॉईन. याची सुरवात २०१३ साली IBM कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी केली होती.
गंम्मत अशी की हा कॉईन इतर कॉईनची चेष्टा करायला मज्जेसाठी काढण्यात आलेला होता. त्यामुळेच याच नाव आणि लोगो मीम शीबा इनु पासून घेण्यात आलं होतं. बिटकाईन आणि डॉगीकाईनमध्ये फरक एवढाच की डॉगीकाईमनमध्ये अप्पर लिमीट नाही.
किती वर गेलाय आणि का ?
१ फेब्रुवारीला डॉगीकॉईनची किंमत ३.८ सेंट होती ती५ मे ला ६६ सेंट झाली. फेब्रुवारीच्या सुरवातीला ज्यांनी डॉगी कॉईनमध्ये १००० हजार डॉलर टाकले होते त्यांचे आज १७ हजार डॉलर झाले. मार्केट कॅपचं सांगायचं झालं तर ८५ अब्ज डॉलर झालय. यामागचं कारण एलॉन मस्कचा पाठींबा हेच सांगितल जातय. दूसरं कारण म्हणजे तेजीत किंमती वाढायला • लागल्यामुळे फियर ऑफ मिसींग आऊट म्हणजे नफा न झाल्याची भिती मार्केटमध्ये पसरते. आपण लावायला पाहीजे होते ही भिती अजून गुंतवणूक करायला लावते. या भितीतून कॉईनची किंमत वाढत
टेस्लाचे मालक व जगाचे आदर्श एलॉन मस्क यांनी देखील डॉगीकॉईनला समर्थन दिलेले आहे. त्याच्या ट्विटमुळेच डॉगीकॉईनचे मुल्य वाढण्यास सुरवात येत गेली किंवा अधिक वेगाने ही किंमत वाढली जावू लागली. इतक्यावर हे भाऊ थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या ट्विटरच्या बायोत माजी फॉर्मर CEO ऑफ डॉगीकाईन पण लिहून टाकलं.
पुढील वेळेस अधिक माहिती देऊ क्रिप्टो करेंसी इन्व्हेस्टमेंट कशी करायची याविषय
क्रमश
विशेष माहिती सोर्स बोल भिडू
प्रथमेश विकास आबनावे
Really helpful information. Keep rocking.
LikeLike